नवी शक्कल! भामट्यांनी पैसे लुटण्याची नवी पद्धत शोधली, CA तरुणीला सव्वादोन लाखाचा चुना - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

नवी शक्कल! भामट्यांनी पैसे लुटण्याची नवी पद्धत शोधली, CA तरुणीला सव्वादोन लाखाचा चुना

 टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या सर्व काही ऑनलाइन झालं आहे. डीजिटल इंडियाच्या दिशेने सर्व देशवासी वाटचाल करत आहेत. मात्र डीजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करायला लागल्यापासून अकाउंट हॅक करून पैसे चोरणे, फसव्या लिंक पाठवून फसवणूक करणे अशा गुन्ह्यांची संख्याही वाढू लागली आहे. अशातच पुण्यातील एका CA तरुणीला सव्वा लाखाडा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.


संबंधित तरूणीला सिम कार्ड कंपनीतून बोलत आहे असं सांगून ही फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी तरूणीला फोन करत तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल ऑपरेटर कंपनीतून बोलत असल्याचं सागितलं.


तरूणीला सांगितलं की तुमच्या मोबाईलमधील सिम हे 3G आहे ते लवकरात लवकर 4G करून घ्या अन्यथा तुमच सिम कार्ड ब्लॉक होईल, अशी भीती घातली.


त्यानंतर भामट्यांनी तरूणीला एक 20 अंकी नंबर पाठवला आणि त्यावर क्लिक करायला सांगितलं. तरूणीनेही त्या नंबरवर क्लिक केलं आणि काही क्षणातच तिचं सिम कार्ड तात्काळ बंद झालं.


दरम्यान, भामट्यांनी सिम कार्ड दुसऱ्या नंबरवर क्लोन करून तरूणीच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले. काही वेळानंतर तरूणीला बँकेचा पैसे काढल्याचा मेसेज आला.


तेव्हा तरूणीच्या डोक्यात टूप पेटली की आपली फसवणूक झाली आहे. त्यानंतर तिने आपल खातं ब्लॉक केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जावून FIR दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे नागिरकांनी अशा भामट्यांपासून सावध राहिलं पाहिजे.

Pune Vamtas find new way to loot money, CA girl from gets Rs 12 lakh!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा