Ujani Update : उजनीतून भीमा नदीत पुन्हा 30 हजार क्युसेकचा विसर्ग, धरण 111 टक्के भरले - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

Ujani Update : उजनीतून भीमा नदीत पुन्हा 30 हजार क्युसेकचा विसर्ग, धरण 111 टक्के भरले

 टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरण 111.05 टक्के भरले असून मंगळवारी सकाळपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातून 30 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. 


सोमवारी उजनीतून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले होते. मात्र रात्री उजनीसह पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे. भीमा नगरला 22 मि.मी.ची नोंद आहे. आज मंगळवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता उजनीतून भीमेत 16 दरवाजे 0.44 मीटरने उघडून 30 हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. 


याचबरोबर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.वीर धरणातून 800 क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. भीमा नदी मंगळवारी 15 सप्टेंबरला संगम येथे 23 हजार तर पंढरपूरजवळ 13 हजार क्युसेकने वाहात होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा