ऑनलाईन मोटर सायकल खरेदीच्या बहाण्याने मंगळवेढ्यातील तरूणाची फसवणूक - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

ऑनलाईन मोटर सायकल खरेदीच्या बहाण्याने मंगळवेढ्यातील तरूणाची फसवणूक

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील प्रविण श्रीपती गुरव या युवकास पुणे येथून मोबाईल अॅपवर आलेल्या स्प्लेंडर मोटर सायकल खरेदीच्या व्यवहारात अज्ञात व्यक्तीने २० हजार रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी मंगळवेढा पोलिसात तक्रार अर्ज देण्यात आला असून त्या अज्ञात फसवेगिरी करणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. 


या घटनेची हकिकत अशी,पाटखळ येथील प्रविण गुरव हे व्यवसायाने प्लंबर असून त्यांना जुनी स्प्लेंडर मोटर सायकल जाहिरात मोबाईल अॅपवर पुणे आली होती . या जाहिरातीबाबत गुरव यांनी संपर्क साधला असता पुणे खडकी कँपमधून संजीव रघुवंशी (मेजर) एअर पोर्टवरून बोलत असल्याचे मोबाईल क्रमांक ७०९९४६५९९७ वरून सांगण्यात आले. 

तुम्हाला मोटर सायकल हवी असल्यास सुरुवातीला २१०० रुपये अॅडव्हान्स पाठविण्याचा सल्ला दिला. गुरव यांनी प्रथम २१०० रुपये पाठविल्यानंतर पुन्हा ४ ९९९ रुपये भरण्यास सांगितले . असे करीत एकूण २० हजार रुपये भरल्यानंतर मोटर सायकल कधी मिळणार असा सवाल केल्यानंतर पंढरपूरपर्यंत मोटर सायकल आली असून उर्वरीत रक्कम आणखी तुम्हाला भरावी लागेल असा आग्रह त्या मेजरने धरला. 


आपले २० हजार रुपये जावूनही मोटर सायकल मिळत नसल्याचे गुरव यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मेजरकडे आणखी मोटर सायकल पार्सलचे पैसे भरावे लागतील असे म्हणताच गुरव खडबडून जागे होत आपण फसलो जात असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला.


ठाणे अंमलदार संजय राऊत यांनी सदर मोबाईल क्रमांकावर कॉल करून या मोटर सायकलबाबत विचारणा केली असता त्या व्यक्तीने तात्काळ फोन कट करून स्वीच ऑफ केला. गुरवप्रमाणेच पाटखळ येथील आणखी एका तरूणाला फसविण्याचा प्रकार घडला आहे. 


पुणे येथून बोलणारा तो मेजर एअरपोर्टवर नोकरीस असल्याचे हिंदीमधून व इंग्रजीमधून सांगत होता. आपणास मराठी येत नाही का असे पोलिसांकडून विचारणा केल्यावर येत नसल्याचे त्याने सांगितले.यावरून तो अन्य राज्यातील असावा असा अंदाज रुपये व्यक्त करण्यात आला.बाहेरच्या राज्यातील असे लोक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अमिष दाखवून नागरिकांना लुटण्याचा आणखी गोरख धंदा करीत आहेत. 


सध्याचे असा युग हे फेसबुक , व्हॉटसअॅप जमान्याचे आहे . या माध्यमातून अनेक साधनांच्या जाहिराती ऑनलाईन बुक करा व घरपोच मागवा अशा स्वरूपात येत असतात.या भुलथापांना युवक बळी पडत आहेत.युवकांनी अशा भुलथापांना बळी पडू नये तसेच कुठलाही मॅसेज खातरजमा केल्याशिवाय पैशाचा व्यवहार करू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.Young man cheated on Mars under the pretext of buying a motorcycle online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा