वयोवृद्ध पती-पत्नीची गळपास घेऊन आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील दुदैवी घटना - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

वयोवृद्ध पती-पत्नीची गळपास घेऊन आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील दुदैवी घटना

 टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील उक्कडगाव (ता.बार्शी) या गावात वयोवृद्ध दाम्पत्यानी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कोणत्या तरी अज्ञात कारणावरून जेष्ठ पती - पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास उक्कडगाव (ता.बार्शी) येथे उघडकीस आली.
प्रभाकर पंढरी मुळे (वय ६५) व मुक्ताबाई प्रभाकर मुळे (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे़ याबाबत दिपक बजरंग मुळे (वय ४२ रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलीसात खबर दिली आहे.


मयत प्रभाकर पंढरी मुळे व त्यांची पत्नी मुक्ताबाई प्रभाकर मुळे या पती-पत्नीने राहत्या घरात साडीच्या बनविलेल्या दाव्याच्या सहाय्याने लोखंडी आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली.


याबाबतची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलिस कर्मचारी मनोज भोसले, मनोज जाधव, कुणाल पाटील, शैलेश चौगुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. 


याबाबत पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी मनोज भोसले हे करीत आहेत.
Barshi taluka Suicide of elderly couple;  The unfortunate incident

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा