केंद्राने केला वांदा! कांद्याच्या निर्यातीवर लादली बंदी, किमती वाढत असताना निर्णय - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

केंद्राने केला वांदा! कांद्याच्या निर्यातीवर लादली बंदी, किमती वाढत असताना निर्णय

 टीम मंगळवेढा टाईम्स । शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून पिकवला कांद्याला केंद्र सरकारनं निर्यातीवर तडकाफडकी बंदी लादली आहे. त्यामुळे काद्यांचे दर घसरणार असून पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याच्या बाजारभावात तेजी येत असल्यानं सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अस्थिरतेच्या कालखंडात अन्नधान्याची महागाई वाढू नये म्हणून केंद्र सरकार दक्ष झाल्याचं पाहायला मिळालं.


निर्यातबंदी लादल्यानं कांद्याच्या बाजारातली तेजी थांबण्यास मदत होणार आहे. मात्र याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कांद्याचे भाव दिलासादायक होऊ लागले असताना सरकारनं जोरदार धक्का दिल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.दरम्यान, बिहार आणि बंगालच्या निवडणुका जवळ आल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचा आरोपही आता सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून केला जाऊ लागला आहे.


शेतकऱ्यांना नुकताच मिळाला होता दिलासा


गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात घसरण होत असलेल्या कांद्याच्या भावात नुकतीच चांगली सुधारणा झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लासलगाव, मनमाड,येवला,मालेगावसह नाशिकच्या बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 600 ते 750 रुपये पर्यंत पोहोचला होता.


या अगोदर कांद्याला खूप कमी भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी कांद्याला योग्य व चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावलं. मात्र केंद्र सरकारने पुन्हा निर्यातबंदी लादल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे.
Modi government's decision angers farmers, imposes ban on onion exports

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा