मेडशिंगी किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाला मारहाण - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मेडशिंगी किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाला मारहाण

   टीम मंगळवेढा टाईम्स । तुझी मुले माझ्या घराकडे का पाठवतो असे म्हणून सख्या भावाने भावाला डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना रविवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास मेडशिंगी ता.सांगोला येथे घडली आहे.

अर्जुन महादेव लवटे हे मेडशिंगी गावातून घराकडे निघाले होते. त्यावेळी गावातील आश्रमशाळेजवळ आले असताना पाठीमागून आलेल्या भिमराव महादेव लवटे (रा.मेडशिंगी) या भावाने अर्जुन लवटे यांना तुझी मुले माझ्या घराकडे का पाठवतो असे म्हणून अर्जुन लवटे यांना तिथेच पडलेला दगड हातात घेऊन डोक्यात मारून जखमी केले. 


तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत अर्जुन लवटे यांनी भीमराव लवटे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.


Medshingi beats Sakhaya's brother for a minor reason

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा