मंगळवेढा ब्रेकिंग : आजपासुन दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ बदलली - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मंगळवेढा ब्रेकिंग : आजपासुन दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ बदलली
मंगळवेढा टाईम्स टीम । मंगळवेढा शहरातील सर्व प्रकारचे दुकाने उघडणे व बंद करण्याची वेळ आजपासून बदलण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी दिली आहे.


मंगळवेढा शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता.मात्र जनता कर्फ्यू लागू केल्यानंतरही वाढ कमी झाली नाही.


शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्याकडे केली होती त्याअनुषंगाने मंगळवेढा शहर, संत चोखामेळा ग्रामपंचायत व संत दामाजी नगर ग्रामपंचायत मध्ये दुकानाची वेळ पूर्वी असणारी 9 ते 2 ही वाढवून आजपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

वाढविण्यात आलेली वेळ 30 सप्टेंबर पर्यंत राहील. व्यवसायिक व नागरिक यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, सर्वांनी मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे व सॅनीटाॅझरचा किंवा साबनचा वापर करावा असे आवाहन कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा