चिंतेत भर! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा अठरावा बळी; आणखी 31 जणांना लागण - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

चिंतेत भर! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा अठरावा बळी; आणखी 31 जणांना लागण

 टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून आज शहरातील एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 18 झाली आहे तर बाधितांची संख्या 923 वर गेली आहे.


आज दि.15 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत . तसेच आज  243 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.


वरील 243 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह - 31 आणि निगेटिव्ह - 212 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर -11 , दामाजीनगर -04 , नंदूर -02 , भोसे -02 , आंधळगांव -01 , तामदर्डी -01 , शेलेवाडी -01 , लक्ष्मीदहिवडी -03 , धर्मगांव -01 , शिरसी -03 , ढवळस -01 , मरवडे -01 येथील आहेत.


सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT - PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.  


मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 923 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 401 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 504 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

  
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Eighteenth victim of Corona in Mangalwedha taluka;  Another 31 people were infected


राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा