चिंताजनक : सांगोला तालुक्यातील 'या' गावाची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

चिंताजनक : सांगोला तालुक्यातील 'या' गावाची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कोरोना पादुर्भाव मोठ्या संख्येने वाढतच चालला असून सांगोला तालुक्‍यातील महूद येथे डॉक्‍टर,भाजीविक्रेते, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासह 50 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये डॉक्‍टर,भाजीविक्रेता यासह तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आठवडाभरापासून गावामध्ये कडकडीत लॉकडाउन असतानाही महूद हॉटस्पॉट  होण्याच्या मार्गावर आहे.  On the way to Corona hotspot of Mahud village in Sangola taluka


तर मागे सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे गेल्या दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या चाचणीचे अहवाल सोलापूर येथे प्रलंबित आहेत.आठवडाभराहून अधिक काळ महूद येथे कडक लॉकडाउन असतानाही कोरोना संसर्ग थांबेना.येथील रुग्णसंख्या 23 झाली आहे. 

दि.22 जुलै रोजी येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर येथील ग्रामकृती समितीने कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू केली आहे. दवाखाने व मेडिकल वगळता बॅंकांसह सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले आहेत. गावात अनेक ठिकाणी रस्ते बंद करून प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांच्या हालचालींवर चांगलेच निर्बंध आणले आहेत. असे असतानाही रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

प्रशासनाने येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टर, मेडिकल दुकानदार, भाजीविक्रेते व प्रशासकीय कर्मचारी यांना स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार येथील डॉक्‍टर, भाजीविक्रेते, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली. झालेल्या या रॅपिड चाचणीमध्ये एक डॉक्‍टर, एक भाजीविक्रेता यासह तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा दोडमनी यांनी महूदला भेट दिली असून त्यांनी येथील वैद्यकीय कर्मचारी, आशा वर्कर आदींशी चर्चा करून केलेल्या उपाययोजनांची व अडचणींची माहिती घेतली. आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार कामे वेळेत करावीत आशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.


( Source : sakal )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा