मंगळवेढ्यात काेरोनाचा धडाका सुरुच ; चोवीस तासात नवीन 7 रुग्णांची भर - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

मंगळवेढ्यात काेरोनाचा धडाका सुरुच ; चोवीस तासात नवीन 7 रुग्णांची भर


टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत.आज शनिवारी नवीन 7 रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 120 वर गेली आहे.

आज दि.1 ऑगस्ट रोजी 56 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेण्यात आलेले आहेत.

सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT - PCR ) चे 7 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामधील 7 रुग्ण मंगळवेढा शहरातील चोखामेळानगर ग्रामपंचायत येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.  

मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 120
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 52 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 67 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा