धक्कादायक! गाळे विकण्याच्या कारणावरून मुलाने केली वडिलांची हत्या - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

धक्कादायक! गाळे विकण्याच्या कारणावरून मुलाने केली वडिलांची हत्या


टीम मंगळवेढा टाईम्स।  माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे गाळे विकण्याच्या कारणावरून रमेश विठ्ठल माळी (वय 50) यांचा गळा व तोंड दाबून मुलानेच खून केला. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.  solapur Son kills father at Madha Anjangaon Umateयाबाबत मृताची पत्नी अंजना रमेश माळी यांनी माढा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गणेश रमेश माळी (वय 23) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादीनुसार मृत रमेश माळी व त्याचा मुलगा गणेश माळी यांच्यात गाळे विकण्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. रमेश माळी हा मी गाळे विकणारच, असे म्हणत होता. गाळे विकण्यास गणेश याचा विरोध होता.


त्या कारणाने चिडून गणेश याने रमेश माळी यांच्या मानेवर बुक्कीने मारहाण करून खाली पाडले. त्यांचा गळा व नाक, तोंड दाबून त्यांना ठार मारले. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्‍वर भोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा अधिक तपास सपोनि अमुल कादबाने करत आहेत.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा