सोलापूर अश्लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

सोलापूर अश्लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग


टीम मंगळवेढा टाईम्स । वेगवेगळ्या मोबाईलवरून अनेक अश्लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विजय भालचंद्र मरिगुड्डी ( रा.जानकी नगर , जुळे सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. 

होटगी रोडवर राहणाऱ्या विवाहितेचा पती उस्मानाबाद येथे कामास आहे. त्यावेळी कामाच्या माध्यमातून त्याची आणि विजय मरिगुंडी याची ओळख झाली होती. 

दरम्यान , विजय याने त्या इसमाच्या पत्नीचा मोबाईलनंबर मिळवला आणि जानेवारी महिन्यापासून विजयने मित्राच्या पत्नीला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून अश्लिल मेसेज पाठवण्यास सुरूवात केली . तेव्हा तिने ही बाब तिच्या पतीच्या कानावर घातली . पतीने मेसेज आलेल्या नंबरवर फोन केले असता हा नंबर विजयचा असल्याचे कळले. 

याच दरम्यान विवाहितेच्या सासूची तब्येत बिघडल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही . त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यात विजयने पुन्हा विवाहितेला फोन करून अश्लिल मेसेज करत तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून ठार मारण्याची धमकी दिला. 

त्यानंतर विवाहितेने विजापूर नाका पोलिसात विजय मरिगुड्डी विरोधात फिर्याद दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा