संपर्कातूनच वाढतोय मंगळवेढ्यात कोरोना! 'या' भागात पुन्हा 3 रुग्णांची वाढ - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

संपर्कातूनच वाढतोय मंगळवेढ्यात कोरोना! 'या' भागात पुन्हा 3 रुग्णांची वाढ


टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.आज रविवारी पुन्हा 1 दामाजीनगर येथे व 2 मंगळवेढा येथे असे 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या 123 वर गेली आहे.

आज दि.2 ऑगस्ट रोजी 45 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. 

सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT - PCR ) चे 3 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. हे 3 रुग्णापैकी 1 दामाजीनगर येथील 2  मंगळवेढा येथील येथील आहेत. हे तिन्ही यापुर्वीचे निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.


मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 123
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 52 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा