चांगली बातमी : राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्क्यांवर पोहोचला - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

चांगली बातमी : राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्क्यांवर पोहोचला


टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात शुक्रवारी दिवसभरात ७ हजार ५४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे . राज्यात एकीकडे कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत असले तरी रोज कोरोना रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. 

काल दिवसभरात ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडले होते. आजपर्यंतची ही सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या होती. 

शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने १० हजार ३२० चा आकडा गाठला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख २२ हजार ११८ इतकी झाली आहे , अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा