सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारी 194 कोरोना बाधितांची भर;कोरोना बळीची शंभरी पार - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

सोलापूर ग्रामीणमध्ये शुक्रवारी 194 कोरोना बाधितांची भर;कोरोना बळीची शंभरी पार


टिम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमधील 902 व्यक्‍तींच्या अहवालात 194 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या साडेतीन हजारांहून अधिक, तर मृतांची संख्या 103 झाली आहे. Solapur rural corona updated friday


पंढरपुरातील भाईभाई चौक, संत पेठ, फुलचिंचोली, सिध्दीविनायक सोसायटी येथे चार रुग्ण सापडले. माढ्यातील कुर्डे गल्ली, भोसरे, पापनस, रांझणी, रिधोरे येथे दहा रुग्ण, 

तर सांगोल्यातील महादेव गल्ली, कोळा, महूद, निझामपूर येथे 13 रुग्ण आढळले. करमाळ्यातील आंबेडकर चौक, दत्त पेठ, कानड गल्ली, कसाब गल्ली, खडकपुरा, मेन रोड, मौलाली माळ, राशिन पेठ, सावंत गल्ली, सुतार गल्ली, जातेगाव, जेऊर, शेलगाव (क) येथे 30 रुग्ण सापडले. उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, डोणगाव, राळेरास येथे 12 आणि मोहोळ तालुक्‍यातील कामती बु., खंडाळी, पापरी, वाघोलीवाडी येथे पाच रुग्णांची भर पडली. 

बार्शीतील आडवा रस्ता, आशा टॉकीज, भवानी पेठ, भिम नगर, चोरमले प्लॉट, लहुजी चौक, म्हाडा कॉलनी, मंगळवार पेठ, मनगिरे मळा, नळे प्लॉट, जुना मार्केट यार्ड, रामभाऊ पवार, रोडगा रस्ता, सोलापूर रोड, सुभाष नगर, वानी प्लॉट, झाडबुके मैदान, आगळगाव आणि सासुरे याठिकाणी 57 रुग्ण आढळले आहेत.

अक्‍कलकोटमधील माणिक पेठ, मैदंर्गी, चपळगाव, काझीकणबस, शावळ, सुलेरजवळगे, तडवळ येथे नऊ रुग्ण सापडले. दक्षिण सोलापुरातील बिर्ला सिमेंट कंपनी, दर्गनहळ्ळी, कंदलगाव, कारकल, मुस्ती, सादेपूर, वळसंग येथे 20 रुग्ण आढळले आहेत. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, फोंडशिरस, लवंग, महाळूंग, माळेवाडी, माळीनगर, माळखांबी, मांडवे, संग्राम नगर, सवतगाव, वेळापूर, विझोरी, यशवंत नगर या ठिकाणी 33 रुग्ण सापडले.सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये झाल्या 26 हजार 795 व्यक्‍तींच्या कोरोना टेस्ट ग्रामीणमधील कोरोना रुग्णांची संख्या झाली तीन हजार 653 रुग्ण,पंढरपुरातील डोंबे गल्ली, भंडीशेगाव, वैराग, मंद्रूप, अक्‍कलकोटमधील शावळ येथील रुग्णांचा मृत्यू,बार्शीची रुग्णसंख्या 810, दक्षिण सोलापूर 575, पंढरपूर 506 तर अक्‍कलकोटमध्ये 474 रुग्ण
आतापर्यंत दोन हजार 108 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 442 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा