मालिका पाहून तीन मुलांनी स्वत:च्याच अपहरणाचा रचला बनाव - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

मालिका पाहून तीन मुलांनी स्वत:च्याच अपहरणाचा रचला बनाव< टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी  येथील तीन मुलांचे अपहरण झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली.अन पोलिसांना अक्षरशः घाम फुटला. तब्बल चार तासाच्या सखोल चौकशीनंतर अखेर ती टि.व्ही.वरील सी.आय.डी. मालिका पाहून अल्पवयीन तीन मुलांनी अपहरणाचा केलेला बनाव असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.  Pretend to have been abducted by three minors after watching the CID series

< या घटनेची हकिकत अशी,लक्ष्मी दहिवडी येथील अल्पवयीन तीन मुले हे 11,12 व 15 या वयाचे मित्र असून दि.30 जुलै रोजी सकाळी 10.00 वा. खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडले.हे तिघेजण फिरत फिरत आंधळगाव येथील फॉरेस्टमध्ये गेले. तेथे  थोडा वेळ घालविल्यानंतर पुढे महमदाबाद शेटफळच्या दिशेने जात असताना वाटेत भूक लागल्यानंतर बागेतील दाळिंब घेवून खाल्ली व रमणीय होत पुढे पायी चालत शेटफळ या गावी पोहोचले.तेथे गेल्यानंतर बिस्कीट खावून लागलेली भूक शमवली.

एका पानटपरीवर जावून त्यांनी आम्हाला एका अज्ञात व्यक्तीने कारगाडीत घालून तोंडावर गुंगीची पावडर टाकून आणल्याचे कथन केले.सकाळी मुले बाहेर पडली ती सायंकाळपर्यंत घरी न आल्याने इकडे पालकवर्ग चिंतेत पडला होता. <

या दरम्यान पानटपरी चालकाने भ्रमणध्वनीवरून लक्ष्मी दहिवडी गावचे सरपंच प्रकाश जुंदळे यांना कळविले. गुंगीची पावडर टाकून तीघांना पळविल्याची वार्ता सर्वत्र पसरली.पालकांनी महमदाबाद येथे जावून आपली मुले ताब्यात घेतली व सदर अपहरण करणार्‍या त्या अज्ञात कार चालकाविरोधात तक्रार देण्यासाठी  पालक व गावचे पोलिस पाटील मधूकर पाटील, मुलासह गुरुवारी रात्री 9.00 वा. पोलिस स्टेशनमध्ये  पोहोचले.

मुले अल्पवयीन असल्याने मुलांच्या मनात भिती वाटू नये याची खबरदारी घेत पो.नि.गुंजवटे यांनी आपल्या अंगावरील वर्दी बदलून ते सिव्हील ड्रेसवर आले. त्या तीन मुलांकडे तब्बल चार तास सखोल चौकशी केल्यानंतर त्या तीघा अल्पवयीन मुलांनी आपण टि.व्ही.वरील सी.आय.डी.मालिका बघून आम्हाला गुंगीची पावडर टाकून अपहरण केल्याचा बनाव केल्याचे चौकशीअंती सांगितले.या तीघांकडून लेखी जबाब घेवून त्यांना सोडून देण्यात आले. <

दरम्यान,मंगळवेढा पोलिस ठाण्यात तीन कैदी पळाल्याचा तसेच आरोपीला त्याच्या गावी मटण पार्टीला नेल्याच्या या दोन घटनेमुळे पोलिस अधिकारी तणावाखाली होते. यात तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याची घटना पोलिसांना समजताच पोलिस कर्मचार्‍याना अक्षरशः घाम फुटला मात्र ही सत्य घटना नसून मुलांनी केलेला अपहरणाचा बनाव असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्यानंतर सुटकेचा निःश्‍वास सोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा