दुसऱ्याच्या नावाने असलेले चारचाकी वाहन नोंदणीकृत न करता वापरणाऱ्यांवर गुन्हा - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

दुसऱ्याच्या नावाने असलेले चारचाकी वाहन नोंदणीकृत न करता वापरणाऱ्यांवर गुन्हा


टीम मंगळवेढा टाईम्स । दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावाने असलेले चार चाकी वाहन परस्पर बनावट नंबर प्लेट लावून बेकायदेशीररित्या वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या पुणे येथील एका कंपनीसह चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.विजय दत्तात्रय माने ( वय ४० , रा.येवती , ता . मोहोळ ) , मुन्ना शेटे ( रा . भोसले चौक , ता .पंढरपूर ) , कादिर दिलावर तांबोळी (वय ३६ , रा . दमाणी नगर , सोलापूर) , दिगंबर केराप्पा मेटकरी ( वय ४८ , रा . वारद चाळ , मुरारजी पेठ ) व एस कुदळे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ( मांजरी बुद्रुक , पुणे ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

आरोपीने युनुस मोहम्मद नदाफ ( रा . पिंजरवाडी , ता . दक्षिण सोलापूर ) यांच्या मालकीची मारुती सुझुकी स्विफ्ट या कारवर एम एच १३ , ए . झेड २३५ ९ या क्रमांकाचे बनावट नंबरप्लेट तयार करून वाहनाचे कोणतेही मालकीहक्क नसताना बेकायदेशीररित्या वापरले.

 सन २०१४ पासून अद्यापपर्यंत नोंदणी न करता , शासनाची इन्शुरन्स न भरता व फिटनेस प्रमाणपत्र ही प्राप्त न करता बेकायदेशीररित्या वापरून शासनाची व अर्जदार युनुस नदाफ यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण निवृत्ती थोरात यांनी फिर्याद दिली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने हे करीत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा