शिवसेना नेते आंधळकर यांच्यावर गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

शिवसेना नेते आंधळकर यांच्यावर गुन्हा दाखल


टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिबंधित क्षेत्रातील बांबू काढून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह चौघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस कर्मचारी संदीप अलाट यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. शहरातील मदिना मशीद ते सोमाणी हॉस्पिटल प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. 

यामध्ये प्रवेश करून शिवसेना नेते आंधळकर यांच्यासह इतरांनी बांबू काढून सरकारी कामात अडथळा केला असे या फिर्यादीत म्हटले आहे. 

यामुळे आंधळकर यांच्यासह दीपक आंधळकर , बापू तेलंग , इरफान शेख , शगिर शेख , समाधान सातपुते , अक्षय कदम , जावेद पठाण , सागर कळमणकर , बापू काळे , मनीष चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा