सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाची लाट! आज पुन्हा 179 बाधितांची भर;दोघांचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १८ जुलै, २०२०

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाची लाट! आज पुन्हा 179 बाधितांची भर;दोघांचा मृत्यू
टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत असले तरी दुसर्‍या बाजूला कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. शनिवारी आणखी 179 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे.एकूण बाधितांची संख्या 1 हजार 563 वर गेली आहे.तर मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथील 45 वर्षाच्या पुरुषाचा व येवती येथील 60 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


शनिवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2061 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1882 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 179 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त होऊन 54 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अक्कलकोट (पु.16.स्त्री.16) 32, बार्शी (पु.14.स्त्री.3) 17, करमाळा (पु.2) 2,माढा (पु.14.स्त्री.8) 22,माळशिरस (पु.4.स्त्री.2) 6,मंगळवेढा (पु.36.स्त्री.1) 37,मोहोळ (पु.4.स्त्री.5) 9,उत्तर सोलापूर (पु.6.स्त्री.6) 12 , पंढरपूर (पु.6.स्त्री.1) 7, सांगोला (3 स्त्री) 3 ,दक्षिण सोलापूर (पु.15.स्त्री.17) 32 असे एकूण 179 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.


आतापर्यंत ग्रामीण भागातील 10 हजार 809 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 10 हजार 715 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 9 हजार 153 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 1 हजार 563 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 94 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, तर मृतांचा आकडा 43 वर पोहोचला आहे. अद्यापही 1006 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 514 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सर्वाधिक संख्या दक्षिण सोलापूर तालुक्यात

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून दक्षिण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 390 वर पोहोचली आहे. बार्शीतील कोरोनाबाधितांची संख्या आता 362 वर पोहोचली आहे. आतापर्यंत अक्कलकोट 292, उत्तर सोलापूर 140, करमाळा 21, माढा 63, माळशिरस 32, मंगळवेढा 47, मोहोळ 101, पंढरपूर 105, सांगोला 10 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा