कोरोनात आरोग्याशी असा खेळ! 'या' गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात सापडल्या आळ्या - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२०

कोरोनात आरोग्याशी असा खेळ! 'या' गावातील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणात सापडल्या आळ्याटीम मंगळवेढा टाइम्स । कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्यादायी गोष्टींना अधिक महत्त्व प्रात्प झालं आहे. स्वच्छ जागा, स्वच्छ अन्न आणि शुद्धता ही सध्या महत्त्वाची तत्वे आहेत. पण आरोग्याच्या या परीक्षेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Arrive at the patient's meal at Mohol's Quarantine Center


मोहोळ शहरासह तालुक्यातील कोरोना रूग्णाची संख्या रोजच्या रोज वाढत आहे.मोहोळ प्रशासनाकडून रूग्ण व त्यांच्या सर्पकात आलेल्याना क्वारंटाईन करून सेंटरमध्ये ठेवत आहेत. क्वारंटाईन केलेल्याना जेवण प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. सेंटर मध्ये जेवण निकृष्ठ दर्जाचे देण्यात येत आहे. मंगळवार दि.28 जुलै 2020 रोजी दिलेल्या जेवणाध्ये आळ्या व खडे निघाले.


जेवणात आळ्या असल्याचे दिसून आल्यानंतर काही जणास उलट्या झाल्याचे सांगण्यात आले. क्वारंटाईन करण्यात आलेल्या च्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रकार मोहोळ येथील प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहितीअशी की,मोहोळ शहरातील रोहिदास नगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यानंतर मोहोळ येथील प्रशासनाने त्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांना मोहोळ शहरातील गरड महाविद्यालयाच्या इमारती मध्ये क्वारंटाईन केले आहे. मात्र या ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना सकस व दर्जेदार अन्न दिले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.


मंगळवारी 28 जुलै रोजी या क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना दिलेल्या जेवणामध्ये आळ्या,खडे आढळले. हे जेवण खाल्ल्यानंतर येथील रुग्णांना मोठ्या प्रमाणात उलट्यांचा त्रास सुरू झाला होता.


घटनेची माहिती मिळताच मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे,नगरपरिषदेचे कर विभागांच्या प्रमुख हाके , व महसूल कर्मचारी यांनी तात्काळ क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.सेंटर मधील लोकांना सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ यांच्या नियंत्रणाखाली ठेकेदारामार्फत अन्नपुरवठा केला जातो.


मात्र त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल कार्यालयाचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये दर्जेदार अन्न दिले जात असल्याचा प्रशासनाचा दावा या घटनेमुळे फोल ठरला असून प्रशासन याबाबत असंवेदनशील असल्याचे समोर आले आहे.आळ्याच्या प्रकारामुळे मोहोळ शहरासह तालुकावासीयांतून संताप व्यक्त केला जात असून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


दरम्यान 28 जुलै रोजी मोहोळ शहरात व तालुक्यात नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये मोहोळ शहरातील रोहिदास नगर 3 , साठे नगर 2 , पापरी 2 , कामती बु .7 रूग्ण मिळून आले आहेत.


क्वारंटाईन करण्यापूर्वी आम्ही प्रशासनाला होम क्वारंटाईन करण्याची विनंती केली होती. मात्र प्रशासनाने आम्हाला गरड महाविद्यालयाच्या इमारतीत क्वारंटाईन केले. या ठिकाणी आमची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या ठिकाणचे अन्न खाल्ले तर कोरोनापूर्वी हे अन्न खाऊनच मरण्याची वेळ आमच्यावर येईल. - क्वारंटाईन इसम,मोहोळ


ठेकेदाराला नोटीस काढणार


गेल्या अनेक दिवसांपासून हे क्वारंटाईन सेंटर सुरू आहे. या पूर्वी अशी घटना घडली नाही. आज की घटना समोर आल्याने संबंधित ठेकेदाराला आम्ही कारणे दाखवा नोटीस काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत. - गणेश क्षीरसागर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळ.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा