बाप रे! मंगळवेढ्यातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींची होणार तपासणी - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १५ जुलै, २०२०

बाप रे! मंगळवेढ्यातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींची होणार तपासणी




टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाशी लढा देणाऱ्या सलगर (बु) येथे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची मंगळवेढ्यातील ही पहिलीच घटना आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील रहिवासी असलेले व सलगर (बु) येथे कामास असलेल्या एका डॉक्टरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

मरवडे ता.मंगळवेढा येथील रहीवासी असलेले व सलगर बु.येथे कामास असलेले एका डॉक्टर पुरुष व्यक्तीचा आज दि.15 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांचेवर सध्या सोलापूर येथे उपचार चालु आहेत.

सदर व्यक्तीचे निकट संपर्कात ( high risk contacts ) आलेल्या व्यक्तींची संख्या 23 असुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवणेत आलेले आहे. त्यांचे कोरोना चाचणी अहवाल तात्काळ मिळणेकामी त्यांचे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करणेत येणार आहेत.


तसेच त्यांचे कमी संपर्कात असलेल्या ( low risk contacts ) व्यक्तींची संख्या 305 आहे. त्यांना घरातच विलगीकरण कक्षात राहणेचे सुचना प्रशासनाकडुन देण्याचे कामकाज चालु आहे.

आरोग्य विभागामार्फत पुढील कामकाज सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा