निष्काळजीपणा भोवला! कोरोनाची लक्षणे असतानाही फिरल्याने 'त्या' शिक्षकावर गुन्हा - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, July 1, 2020

निष्काळजीपणा भोवला! कोरोनाची लक्षणे असतानाही फिरल्याने 'त्या' शिक्षकावर गुन्हा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाची लक्षणे आढळून आलेली असतानाही सार्वजनिक ठिकाणी फिरल्याप्रकरणी राजेश वसंत धोपटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.  A crime against a teacher for walking around with corona symptoms pandharpur city


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , राजेश वसंत धोपटे ( वय ४ ९ , रा . बेलीचा महादेवाजवळ , संभाजी चौक , पंढरपूर ) यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत होती. कोरोनासारख्या संसर्गजन्य भयानक रोगाबाबत माहिती असताना व स्वत : मध्ये लक्षणे आढळून आलेली असतानाही राजेश धोपटे स्वत : च्या घरी थांबणे गरजेचे होते.

तरीही ते घर सोडून सार्वजनिक ठिकाणी जाऊन सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. इतरांच्या जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातक कृती केली आहे. यामुळे धोपटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment