आरोग्य सेविकापदाच्या नेमणुकीसाठी घेतली लाच; जिल्हा परिषदेतील दोघांना रंगेहाथ पकडले - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २८ जुलै, २०२०

आरोग्य सेविकापदाच्या नेमणुकीसाठी घेतली लाच; जिल्हा परिषदेतील दोघांना रंगेहाथ पकडले


टीम मंगळवेढा टाईम्स।  एका महिलेस आरोग्यसेविका म्हणून तात्पुरती नियुक्‍ती देण्याची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. कनिष्ठ प्रशासन अधिकारी अलिसाब रज्जाक शेख आणि वरिष्ठ सहायक कुमार नागप्पा बसमुंगे अशी त्यांची नावे आहेत.  


तक्रारदाराच्या पत्नीला आरोग्यसेविका म्हणून तात्पुरती नियुक्‍ती हवी होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यावेळी आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अलिसाब शेख आणि वरिष्ठ सहायक कुमार बसमुंगे यांनी तक्रादाराकडे 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.


त्यातील अर्धी रक्‍कम फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी देण्याचे ठरले. तर उर्वरित रक्‍कम काही दिवसांनी द्यायचे ठरले. त्यानुसार सोमवारी (ता. 27) 40 हजार रुपयांची लाच घेताना त्या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा