सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचं संकट गडद, 24 तासात '40' नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, July 1, 2020

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचं संकट गडद, 24 तासात '40' नवे रुग्ण ; एकाचा मृत्यू


समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केलेला असून  जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार  कोरोनाबाधितांची एकूण संख्या  401 झाली असून आज 40 नवे रूग्ण आढळून आले आहेत . यात उत्तर सोलापूर तालुक्यात 17 रुग्ण आढळले आहेत तर अक्कलकोट तालुक्यात 7 व  पंढरपूर तालुक्यात 5 तर मोहोळ मध्ये 2 रुग्ण तर दक्षिण सोलापूर तालुक्यात 9 असे आज बुधवारी 40 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा कोरोराने मृत्यू झाला आहे.

 ( solapur rural corona virus update )

आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून )  229 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 40 पॉझिटिव्ह आहेत तर 189 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 401 झाली आहे.


कोरोनामुळे जिल्ह्यात 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 154 जण घरी परतले आहेत.229 जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान आज बक्षिहिप्परगा , ता.दक्षिण सोलापूर . नविन विडीघरकुल , ता.दक्षिण सोलापूर . होटगी स्टेशन , ता.दक्षिण सोलापूर . लिंबीचिंचोळी , ता.दक्षिण सोलापूर . कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर . मुळ पत्ता मुंबई सध्या पंढरपूर शहर . तालुका पोलिस स्टेशनच्या पाठी मागे , पंढरपूर . गणेश नगर , पंढरपूर . शेगाव दुमाला , ता.पंढरपूर . आष्टे , ता.मोहोळ . महबुब नगर , मोहोळ . किस्तके मळा , अक्कलकोट . माणिक पेठ , अक्कलकोट . बुधवार पेठ , अक्कलकोट . बाणेगाव , ता.उत्तर सोलापूर . मार्डी , ता.उत्तर सोलापूर  या ठिकाणी नवे रुग्ण आढळून आले आहेत .

तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः


अक्कलकोट 74, बार्शी 51 , करमाळा 1 , माढा 8 , माळशिरस 5 , मोहोळ 23, उत्तर सोलापूर 45 , पंढरपूर 21 , सांगोला 3, दक्षिण सोलापूर 168 . असे एकूण 401 रुग्ण

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment