मंगळवेढाकरांसाठी चिंतेची बाब; तालुक्यात आज 3 नवे कोरोनाबाधित सापडले - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ११ जुलै, २०२०

मंगळवेढाकरांसाठी चिंतेची बाब; तालुक्यात आज 3 नवे कोरोनाबाधित सापडले
समाधान फुगारे । मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथील एक महिला व बोराळे गावातील दोघांची असे तीन कोरोना चाचणी रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की,मंगळवेढा ( नागणेवाडी )  येथील एका महीलेचा आज दिनांक 11/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला  मंगळवेढा येथील स्थानिक रहीवासी आहे.

याबाबत वस्तुस्थिती अशी की , सदर महिला  इचलकरंजी येथे काही दिवस राहुन मंगळवेढा येथे परत आली आहे. सदर महिला व्यक्तीस त्रास होवु लागल्याने प्रथम मंगळवेढा येथे उपचार घेतले असुन पुढील उपचारासाठी सोलापूर येथील यशोधरा हॉस्पीटल मध्ये अॅडमीट आहे. तेथेच तिचा कोरोना चाचणी अहवाल घेणेत आलेला होता तो आज रोजी पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला व्यक्तीचे संपर्कात आलेले high risk contacts आणि low risk contacts शोधणेचे कामकाज सुरु करणेत आलेले आहे.


मंगळवेढा शहरामध्ये कोरोना या आजाराचा प्रार्दुभाव वाढु नये या करीता मंगळवेढा नगरपरिषद हद्द परीसर , मंगळवेढा शहरालगत ग्रामीण परीसर आणि शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायती  श्री . संत दामाजीनगर ग्रामपंचायत हद्द परीसर व श्री.संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परीसर व त्याच्या आजुबाजुच्या एक ( 01 ) किलो मीटर पर्यंतचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र ( Containment Zone ) म्हणुन घोषीत करणेत आलेला आहे.

तसेच सदर प्रतिबंधीत क्षेत्रापासुन तीन ( 03 ) कि.मी. पर्यंतचे परिसर बफर झोन म्हणुन अलहीदा घोषीत करणेत आलेला आहे . सदर प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये ( Containment Zone ) अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सर्व सेवा आणि आस्थापना पुढील आदेश होईपर्यत बंद करणेत आलेल्या आहेत .


तसेच बोरोळे येथील दिनांक 08/07/2020 रोजी एक व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता . त्याचे कुटुंबातील 4 high risk contacts असलेल्या 4 जणांचे कोरोना चाचणी तपासणीकामी नमुने घेणेत आलेले होते . त्यापैकी दोन अहवाल आज प्राप्त झाले असुन ते पॉझिटिव्ह आलेले आहेत. दोन अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदर दोन्ही ठिकाणी प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली असून , आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे . त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा