मंगळवेढ्यातील दोन जावयांना सासुरवाडीत लोकांकडून बेदम मारहाण - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २७ जुलै, २०२०

मंगळवेढ्यातील दोन जावयांना सासुरवाडीत लोकांकडून बेदम मारहाण

टीम मंगळवेढा टाईम्स । घरगुती किरकोळ भांडणावरून खडकी ता.मंगळवेढा येथील दोघांना लकडेवस्ती (ता.जत) येथील बारा जणांनी चाकू व लोखंडी गजाने जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना खडकी गावात घडली आहे. 
   

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकी (ता.मंगळवेढा) येथील  तम्मा वाघमारे यांच्या घरी पती-पत्नीचे शुक्रवार दि. 24 रोजी किरकोळ कारणावरून घरगुती भांडण झाले.  या कारणावरूनच गोरख महादेव सकट, राजू महादेव सकट, जीवन राजाराम साठे, विवेक संतु सकट, सुनील राजू सकट, ज्योती गोरख सकट, जगु सकट, धोंडाबाई संतू भिसे व अनोळखी चौघेजण अशा एकूण बारा जणांनी खडकी येथे येऊन रात्री साडेदहा वाजता समाधान वाघमारे व तम्मा वाघमारे यांना डोळ्यात चटणी टाकून चाकू व लोखंडी गजाने जबर मारहाण केली यामध्ये समाधान वाघमारे व तम्मा वाघमारे हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

फिर्यादी समाधान वाघमारे याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार राऊत हे करीत आहेत.

खडकी येथील वाघमारे कुटुंबीयांवर रात्री झोपलेले असताना अचानकपणे आरोपींनी हल्ला केल्यामुळे काही वेळ भितीदायक वातावरण निर्माण झाले. यानंतर खडकी गावचे पोलीस पाटील भागवत बेलदार यांना फोनवरून घटना समजताच प्रसंगावधान राखत तात्काळ ते घटनास्थळी दाखल होऊन गावातील काही युवकांच्या मदतीने पाच आरोपींना त्यांनी धरून ठेवले व सदर घटनेची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली.

पकडलेल्या पाच आरोपींना मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर केले. पोलीस पाटील भागवत बेलदार यांच्या या कार्याचे गावात कौतुक होत आहे.

---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा