मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' गावातील एकाला कोरोनाची लागण! तालुक्यात खळबळ - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, ८ जुलै, २०२०

मंगळवेढा ब्रेकिंग : 'त्या' गावातील एकाला कोरोनाची लागण! तालुक्यात खळबळ


समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या गावातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना होम कोरटाईन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. ( Solapur mangalwedha borale one petient positive )


बोराळे ता.मंगळवेढा येथील एक व्यक्तीचा आज दिनांक 08/07/2020 रोजी कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबत माहीती अशी आहे की, सदर व्यक्ती मौजे बोराळे ता. मंगळवेढा येथील स्थानिक रहीवासी असुन शेतकरी आहे. त्याचे कुटुंबात एकुण 5 व्यक्ती आहेत.सदर व्यक्ती  दि. 02/07/2020 रोजी बॅक कामानिमीत्त सोलापूरला गेली होती. त्याच दिवशी बॅक कामकाज करुन मौजे बोराळे येथे परत आली होती.

सोलापूर मध्ये सदर व्यक्ती त्याचे मित्रास भेटली. सदर मित्र  कोरोना पॉझिटिव्ह आलेने त्याचे संपर्कामुळे मौजे बोराळे येथील व्यक्तीस  दिनांक 06/07/2020 रोजी त्रास जाणवु लागल्याने नवनीत तोष्णीवाल हॉस्पीटल, सोलापूर येथे तपासणी कामी गेले होते,  ते आज पर्यंत तेथेचे आहेत तेथेच त्यांची कोरोना चाचणी  करणेत आली असुन त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.


मौजे बोराळे ता. मंगळवेढा हे गाव कंटेनमेंट झोन जाहीर करणेचे कामकाज प्रशासनाकडुन सुरु करणेत आलेले आहे. सदर व्यक्तीचे संपर्कात आलेले high risk contacts व low risk contacts शोधणेचे कामकाज चालु करणेत आलेले असुन प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी  प्रशासन सज्ज आहे. 


त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर  विश्वास  ठेवू  नये. महत्वाचे कामकाजाशिवाय   घराबाहेर पडु नये. घराबाहेर जात असलेस मास्क वापरणे सक्तीचे आहे. बाहेर कोणत्याही वस्तु संर्पक केल्यास स्वत:चे हात सॅनीटाईझ करावेत, चेह-याला हात स्वच्छ धुतल्याशिवाय अथवा सॅनीटाईझ केल्याशिवाय लावु नये.  प्रशासनाने आतापर्यंत दिलेल्या सुचनांचे तंतोतत पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारीउदयसिंह भोसले यांनी केले आहे.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा