प्रिया बेर्डे यांच्यानंतर 'ही' आणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २१ जुलै, २०२०

प्रिया बेर्डे यांच्यानंतर 'ही' आणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक जेष्ठ कलावंत प्रवेश करत आहेत.प्रिया बेर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत. Actress Savita Malpekar will also tie the NCP watch


सविता मालपेकर यांच्याबरोबर अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि अभिनेते-गीतकार बाबा सौदागर, राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या पक्षप्रवेशाबद्दल माहिती दिली आहे.

'काकस्पर्श' या मराठी चित्रपटातील त्यांचा अभिमान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.तसंच 'गाढवाचं लग्न' या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहे.

नटसम्राट, मी शिवाजी पार्क, काकस्पर्श, शिकारी, कॅरी ऑन देशपांडे, इशान्य, कुणी घर देतं का घर या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. तसंच त्या उत्तम नृत्य करण्यात देखील निपुन आहेत.

---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा