संचारबंदीत काळात सोलापूर शहरातील जुगार अड्यावर धाड ; बारा जण अटकेत - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २८ जुलै, २०२०

संचारबंदीत काळात सोलापूर शहरातील जुगार अड्यावर धाड ; बारा जण अटकेत

Solapur news

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी सुरु आहे. या काळातही मुक्तेश्वर नगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जोडभावी पेठ पोलिसांनी धाड टाकून बारा जणांना अटक केली . त्यांच्याकडून रोख रक्कम व अन्य साहित्य मिळून १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  Raid on gambling den in Solapur city; Twelve arrested

आरिफ खुडुस बागवान , शेख , आदिम हुसेन मंगलगिरी , हबीब हसनसाब बागवान , सद्दाम बशीर आयुब रफिक बागव न , इरफान हमीद इनामदार , आसिफलाल मोहम्मद सव्वाल खे , नबीलाल इस्माईल बागवान , रहीम खुद्दुस बागवान , जमीर रजाक शेख , मौलाली इस्माईल शेख , जहाँगीर उस्मान बागव न ( सर्व रा . सोलापूर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्वजण शेळगी परिसरातील मुक्तेश्वर नगरात ५२ पत्यांवर पैशाचा जुगार खेळत होते. 

या ठिकाणी जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना समजताच धाड टाकण्यात आली. बारा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सहा हजार चारशे रुपये रोख रक्कम , दहा हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल हँडसेट व पत्ते जप्त करण्यात आले. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा