दुर्दैवी घटना : सांगोल्यात दारूच्या नशेत पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २७ जुलै, २०२०

दुर्दैवी घटना : सांगोल्यात दारूच्या नशेत पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू


बाळासाहेब झिंजुरटे । दारूच्या नशेत ओढ्यातील पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना २५ जुलै रोजी महिम ता.सांगोला येथे घडली. मधुकर ज्ञानू चव्हाण वय ६५ रा.महिम ता.सांगोला यांना दारूचे व्यसन होते.  Old man dies after drowning under the influence of alcohol

२५ जुलै रोजी दारूच्या नशेत असताना मधुकर चव्हाण हे ओढयात पडले होते. पोहत गेल्यानंतर ओढ्याच्या मध्यभागी ते बुडाले. त्याचा पाण्यात शोध घेतला असता ते सापडले नाहीत. 

२६ जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मयत अवस्थेत मधुकर चव्हाण मिळून आले.याप्रकरणी संतोष चव्हाण यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा