मोठी बातमी : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण! - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २० जुलै, २०२०

मोठी बातमी : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!
टीम मंगळवेढा टाईम्स । देशात व राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.


मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. (Mumbai Guardian Minister Aslam Shaikh tested Corona Positive)
'मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी' अशी विनंतीही अस्लम शेख यांनी केली. 'मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.' असेही अस्लम शेख यांनी सांगितले


कोरोना काळात अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात त्यांनी पाहणी दौरे केले आहेत.
यापूर्वी राज्यातील महाविकासआघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झालेली. हे तिन्ही मंत्री कोरोनावर मात करत आपल्या घरी परतले आहेत.

Mumbai Guardian Minister Aslam Shaikh tested Corona Positive

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा