मंगळवेढ्यात कोरोनाचे संक्रमण थांबेना, आज पुन्हा 7 रूग्णांची वाढ - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २६ जुलै, २०२०

मंगळवेढ्यात कोरोनाचे संक्रमण थांबेना, आज पुन्हा 7 रूग्णांची वाढटीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. रविवारी 7 रूग्णांची भर पडली आहे.

वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज दि.26 जुलै रोजी निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) असणाऱ्या 11 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.  त्या व्यक्तींमध्ये मरवडे येथील 11 जणांचा समावेश आहे.


तसेच आज दि.26 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट मध्ये मंगळवेढा येथील 35 , बोरोळे येथील 5 जणांचा समावेश असून 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी मंगळवेढा येथील 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर उर्वरीत 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.


आज अखेर एकुण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या - 86 झाली आहे.तरी आज अखेर उपचार कालावधीनंतर घरी सोडणेत आलेले रुग्ण संख्या 5 आहे.आणि आज अखेर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 80 झाली आहे. तर आज अखेर मयत रुग्ण संख्या 1 आहे.

वरील स्वॅब घेतलेल्या आणि पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू करणेत आलेले आहे.

वैदयकीय विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करणेत आलेल्या असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा