मंगळवेढा कोरोना ब्रेकिंग : तालुक्यात आज वाढले 'इतके' रुग्ण वाचा दिवसभरातील अपडेट्स - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

मंगळवेढा कोरोना ब्रेकिंग : तालुक्यात आज वाढले 'इतके' रुग्ण वाचा दिवसभरातील अपडेट्स




टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तुरुंगातील आणखी दोन कैद्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांची संख्या 70 वर गेली आहे.


वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज 2 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेतल्या आहेत त्या दोन्ही जणांचे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत.

वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 24 ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 26 असे एकुण 50 कोरोना चाचणी करणेसाठी स्वब घेणेत आलेले असुन सोलापूर येथे तपासणी कामी पाठविणेत आलेले आहेत.

सलगर बु.येथील 13 ,भोसे येथील 13 आणि मंगळवेढा येथील 24 असे एकुण 50 जणांचे स्वब घेणेत आलेले आहेत.

दरम्यान काल दि.22 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत तहसिल कार्यालय येथील सबजेलमधील यापूर्वी रॅपीड अॅन्टीजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या 9 कैदयांचे स्वब घेणेत आलेले होते. ते सोलापूर येथे कोरोना चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविणेत आलेले होते. त्यापैकी 2 कैदयांचे अहवाल प्रलंबित होते ते आज दि.24 जुलै रोजी प्राप्त झाले असुन ते दोन अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

वरील दोन पॉझिटिव्ह हे कैदी असुन ते विलगीकरण कक्षात आहेत.त्यांचे निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत पूर्ण करणेत आलेले असून संबंधितांना विलगीकरण कक्षात ठेवणेत आलेले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील आज अखेर एकूण 70 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.तर आज 5 जणांना घरी सोडण्यात आले आहे. व आज अखेरपर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आणि 64 जण आज अखेर उपचार घेत आहेत.
कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षातील रूग्णांवर वैदयकीय विभागामार्फत लक्ष ठेवणेत येत असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यानी सांगितले.


---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा