खबरदार ! दुकानात साठ वर्षांपुढील व्यक्ती दिसल्यास दुकान होणार सील, 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, July 1, 2020

खबरदार ! दुकानात साठ वर्षांपुढील व्यक्ती दिसल्यास दुकान होणार सील, 'या' जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाला सोबत घेऊन उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने मिशन बिगिन अगेन हाती घेतले आहे. यातूनच टाळेबंदीत शिथिलता देऊन एक जूनपासून अनलॉक एकचा टप्पा सुरू केला आहे; मात्र अनेकजण काळजी न घेता व्यवसाय करीत आहेत. यात साठ वर्षांपुढील व्यक्ती व्यवसायात झोकून देऊन स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. If you see a person above 60 years of age, shop seal, information of Latur District Collector

यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असून, याला आवर घालण्यासाठी साठ वर्षांपुढील व्यक्ती मालक किंवा नोकर म्हणून दुकानात दिसल्यास ते दुकान लॉकडाउन संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे, अशी सक्त कारवाई करण्याबाबत जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात दिली.

कोरोनाचा सर्वाधिक धोका पन्नास वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व बालकांना आहे. हे वारंवार सांगूनही लोक काळजी घेत नसल्याचे दिसत आहे. मला काहीच होणार नाही, या मानसिकतेतून ज्येष्ठ मंडळी घराबाहेर पडून धोका पत्करताना दिसत आहेत. यात बहुतांश विविध व्यवसायांतील कुटुंबांतील व्यक्ती आहेत.
उदगीरला एका ज्येष्ठ किराणा व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात एका व्यापाऱ्याच्या कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्तीवर कोरोनाने घाला घातला. 

जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांत मोठ्या संख्येने ज्येष्ठ व्यक्तीच आहेत. यामुळे प्रशासनाने ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी अभियान हाती घेतले असताना, दुसरीकडे काही व्यावसायिक ज्येष्ठांच्या काळजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

लातुरातील शाळा अन् महाविद्यालयांचा पुनश्च हरिओम लांबला, कोरोनाचा परिणाम

यातूनच ज्येष्ठ मंडळी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जात असून, त्यांचा व्यवसायाच्या निमित्ताने वावर वाढला आहे. याचा फटका काही ज्येष्ठ व्यापाऱ्यांना बसला. काहींना कोरोनाची लागण झाली. ही बाब जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सोमवारी गांभीर्याने घेतली. त्यानंतर दुकानात साठ वर्षांपुढील मालक किंवा नोकर दिसून आल्यास ते दुकान लॉकडाउन संपेपर्यंत सील (बंद) करण्याचा निर्णय घेण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment