भारताच्या माजी क्रिकेट कर्णधाराचा शिपाईपदासाठी अर्ज - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२०

भारताच्या माजी क्रिकेट कर्णधाराचा शिपाईपदासाठी अर्ज


टीम मंगळवेढा टाईम्स । भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचा माजी कर्णधार दिनेश सैन याच्यावर शिपाईपदाच्या नोकरीसाठी अर्ज करण्याची वेळ आली आहे. दिनेशने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच ' नाडा'मध्ये शिपाईपदासाठी अर्ज केला असल्याची माहिती पीटीआयने दिली. Former Indian cricket captain's application for the post of Peon


जन्मापासूनच पोलिओग्रस्त असलेल्या दिनेशने २०१५-२०१९ या कालावधीत भारताच्या दिव्यांग संघासाठी नऊ सामने खेळले. त्याने संघाचे नेतृत्वदेखील केले. वयाच्या ३५ व्या वर्षी कुटुंबाच्या पालनपोषणाच्या दृष्टीने तो नोकरी शोधत असून त्याने शिपाईपदासाठी अर्ज केला आहे.माझे वय ३५ आहे . मी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला आहे . १२ वीनंतर मी फक्त क्रिकेट खेळलो. 


भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले, पण सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. ' नाडा'मध्ये सध्या एक पद रिक्त आहे . त्यामुळे मी शिपाईपदासाठी अर्ज केला आहे , असे त्याने सोनपत येथे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा