मंगळवेढ्याला पुन्हा धक्का! न्यायाधीश, डॉक्टरसह 5 जण कोरोना पॉझिटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १८ जुलै, २०२०

मंगळवेढ्याला पुन्हा धक्का! न्यायाधीश, डॉक्टरसह 5 जण कोरोना पॉझिटिव्ह




टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा येथे आज एक न्यायाधीश,एका डॉक्टरसह 5 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.



ग्रामीण रुग्णालय यांचे मार्फत मंगळवेढा येथे 110 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आज दि.18 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मंगळवेढा येथील 2 जणांचे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. त्यामध्ये एक पुरुष न्यायाधिश व एक महीला समाविष्ट आहे.त्यांचे कोविड केअर सेंटर मंगळवेढा येथे विलगीकरण करणेत येत आहे. उर्वरीत 108 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.



तसेच विलगीकरण कक्षात असलेल्या 24 व्यक्तीचे स्वब कोरोना चाचणी साठी दि.16 जुलै रोजी घेवुन तपासणी साठी पाठवण्यात आलेले होते. त्यापेकी 3 पॉझिटिव्ह 21 निगेटिव्ह आलेले आहेत.


सदर व्यक्ती एक पुरुष (डॉक्टर) मंगळवेढा व कचरेवाडी येथील यापुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे कुटुबांतील एक आणि निकटतम सपंर्कातील आलेल्या पॉझिटिव्ह पुरुष व्यक्तीचे संपर्कातील आहेत.



आज प्राप्त अहवालातील पॉझिटिव्ह व्यक्तींचे त्यांचे निकट संपर्कात ( high risk contacts ) आणि कमी संपर्कात ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे  उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा