मंगळवेढ्यात कोरोनाची लागण झालेले कैदी कारागृहातून पळाले, पण पोलिसांच्या तावडीत असे सापडले - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २० जुलै, २०२०

मंगळवेढ्यात कोरोनाची लागण झालेले कैदी कारागृहातून पळाले, पण पोलिसांच्या तावडीत असे सापडले

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा सबजेलमधील कौलारू खालील लाकडी आडू वरील लोखंडी ग्रील वाकवून त्या फटीतून धूम ठोकलेले व विशेषत: कोरोना पॉझिटिव्ह असणारे तीन कैद्याच्या मंगळवेढा पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे मुसक्या आवळल्या. तीन आरोपीमध्ये दोघे मंगळवेढा परिसरात तर एक कैदी टाकळी सिकंदर ( ता मोहोळ) येथे चोरीची मोटारसायकलवरून जात असताना रंगेहाथ पकडले़ तिन्ही कैदी सापडल्याने मंगळवेढा पोलीस दलाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.


मंगळवेढा सबजेलमधील ४० कैदी पैकी २८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येताच निगेटिव्ह १२ कैदी मंगळवेढा तहसिल कार्यालयात नव्याने उभारलेल्या सबजेल मध्ये शिफ्ट केले़ त्यामुळे जुन्या सबजेल मध्ये असणाऱ्या २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी ३ कैदी सोमवारी पहाटे तीन वाजता कौलारू खालील लाकडी आडू वरील लोखंडी ग्रील वाकवुन त्या फटीतून तिघेही बाहेर येऊन पळून जात असताना धूम ठोकली़ यापैकी दोन कैदी जवळपास सापडले यापैकी एक कैदीने कारागृहाशेजारील किल्ला भाग मधील एक जणांची मोटारसायकल व मोबाईल चोरून धूम ठोकली.

ही घटना समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दोन पोलीस अधिकारी व १५ पोलीस कर्मचारी यांची तीन पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने पाठवली़ यामध्ये पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह अजित मिसाळ, सुनील मोरे, अनिल दाते, बजरंग माने, पोलीस मित्र विजय शेंडगे व सायबर सेलचे खंडू माळी यांच्या टीमने मोठ्या शिताफीने आरोपींना पकडले़ यामध्ये दोन आरोपी कारागृहाच्या जवळपास पहाटे पोलीस उपनिरीक्षक बामणे यांच्या टीमने चारच्या सुमारास पकडले.


तर तिसरा आरोपी किल्ला भागातील एकजणांची मोटारसायकल व मोबाईल चोरी करून धूम ठोकली, त्याला तांत्रिक मदतीच्या आधारे टाकळी सिकंदर ( ता मोहोळ) येथे पोलीस गाडी आडवी लावून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी व त्यांच्या टीमने पकडले.

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा