मंगळवेढ्यात विविध घटनात दोघांचा मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, २८ जुलै, २०२०

मंगळवेढ्यात विविध घटनात दोघांचा मृत्यू

Mangalwedha news

टीम मंगळवेढा टाईम्स । नळी ता.पंढरपूर व शिरशी ठिकाणी दोन इसमांचा विविध घटनात मृत्यू झाला असून याची पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे. पहिल्या घटनेत यातील मयत अशोक तुळशीराम नगरे ( वय ३६ ) याने दि . २७ रोजी १२.०० वा . दारूच्या नशेत राहते घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली.

याची खबर गोरख बालाजी भुई याने दिली आहे. मयताचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. अधिक तपास पोलिस नाईक अमर सुरवसे करीत आहेत. 

तर दुसऱ्या घटनेत अजयकुमार बबन वाघमारे ( वय १९ रा.शिरशी ) हा दि . २७ रोजी सकाळी ८.०० वा . फॅक्सन कंपनीत असलेल्या घाण पाण्याच्या टाकीजवळ कामानिमित्त गेले असता टाकीत पडून मयत झाला असल्याची खबर दत्तात्रय वाघमारे याने दिली आहे. 

पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे . याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा