वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं 'हे' मोठे नुकसान - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, July 1, 2020

वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं 'हे' मोठे नुकसानमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण घरातच आहेत. त्यामुळे नागरिक इंटरनेटचा वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी करतात. तुम्हीदेखील अशा बऱ्याच वेबसीरिज पाहत असाल, ऑनलाइन चित्रपटांचा पुरेपूर आनंद लुटत असाल. मात्र सावध राहा.  Be careful watching the web series, otherwise it could be a big loss

कारण सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने ते तुम्हची फसवणूक करू शकतात. म्हणूनच त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.

सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे.लॉकडाऊनच्या काळात काही फ्री वेबसाईट वर प्रसिद्ध चित्रपट आणि वेब सीरीज फ्री मध्ये दाखवण्यात येत असल्याचं म्हटलं जातं. जेव्हा एक व्यक्ती या साईटवर क्लिक करते तेव्हा एक MALWARE तुमच्या मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करुन तुमचा सगळा डेटा हॅक करतो आणि त्याचा वापर करुन भामटे नागरिकांना त्रास देतात, खंडणी मागतात. सायबर सेलने अशा चित्रपट आणि वेब सीरीजची नावं जाहीर केली आहेत.

देशात असे बरेच लोक आहेत जे कायदेशीर ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यता घेत नाहीत आणि इंटरनेटवर बेकायदेशीरपणे चित्रपट किंवा वेब मालिका पाहतात. असे करणे धोकादायक आहे कारण हीच सवय आपल्याला अडचणीत आणू शकते. त्यामुळे अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा, असं आवाहन महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना केलं आहे. महाराष्ट्र सायबर सेलला अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचं कळतंय.

जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाऊनलोड केली असेल आणि ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी मागत असेल, तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा. शक्यतो अधिकृत आणि खात्रीलायक वेबसाईटवरुनच चित्रपट किंवा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा. तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये लेटेस्ट अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.

टॉप 10 वेब सीरीज
DELHI CRIME
BROOKLYAN NINE-nine
PANCHAYAT
AKOORI
FAUDA
GHOUL
MINDHUNTER
NARCOS
DEVLOK
LOST

टॉप 10 चित्रपट

MARDANI 2
ZOOTOPIA
JAWANI JANEMAN
CHHAPAK
LOVE AAJ KAL
INCEPTION BAHUBALI
RAJNIGANDHA
GULLY BOY
BALA

या यादीतील कोणतीही वेबसीरिज तुम्ही पाहत असाल, चित्रपट ऑनलाइन पाहत असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर सावध राहा. ऑनलाइन मुव्ही पाहताना कोणतीही परवानगी देऊ नका. नाहीतर हॅकर्स तुमचा पर्सनल डाटा चोरी करतील, असं सायबर विभागाने सांगितलं आहे.


No comments:

Post a Comment