ऑगस्टमध्ये 'एवढ्या' दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

ऑगस्टमध्ये 'एवढ्या' दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी


टीम मंगळवेढा टाईम्स । ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे असे कोणते काम असेल, ज्याकरता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज भासणार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. लॉकडाऊन काळात बँका उघडण्याचे आणि बंद होण्याच्या वेळेत काही ठिकाणी थोडासा बदल झाला होता. मात्र संपूर्ण लॉकडाऊनमध्ये बँक कर्मचारी काम करत होते. 

दरम्यान ऑगस्टच्या नवीन महिन्यात बँकांना एकूण 17 दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये रविवार तसंच दुसरा-चौथा शनिवार पकडून एकूण 17 सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी बँक कधी बंद राहणार आणि कधी सुरू हे जाणून  घेणे आवश्यक आहे.

बँकाच्या या सुट्ट्या बकरी ईदच्या सुट्टीपासून 31 ऑगस्ट रोजी असणाऱ्या ओणमपर्यंत आहेत. 1 ऑगस्ट रोजी बकरी ईद असल्यामुळे बँका बंद राहतील. दुसऱ्याच दिवशी रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी बँका बंद असतील. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार आणि 9 ऑगस्ट रोजी रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जयंती दिवशी बँकाना सुट्टी असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्याने काही ठिकाणी बँका बंद असतील.

13 ऑगस्ट रोजी पॅट्रिओटिक डे च्या निमित्ताने इम्फाळ झोनमध्ये बँका बंद राहणार आहेत. 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. त्याही दिवशी बँका बंद असतात. 20 ऑगस्ट रोजी श्रीमंत संकरादेव यांच्या तिथीनिमित्त काही झोनमध्ये बँका बंद असतील. 21 ऑगस्ट रोजी हरितालिका आणि 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त बँका बंद असतील. याशिवाय 29 ऑगस्ट रोजीही कर्मा पूजेनिमित्त काही झोनमध्ये बँका बंद असतील. 31 ऑगस्ट रोजी तिरुओणम निमित्ताने बँका बंद असतील.

बँकांच्या सुट्ट्यांबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India RBI) अधिकृत वेबसाइटवर जाऊन या संबंधात माहिती घेऊ शकता. दरम्यान या सुट्ट्यांच्या दिवशी एटीएम आणि मोबाइल व्हॅन संबंधित कामे तुम्ही पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे ज्या बँकांमध्ये ऑनलाइन व्यवहार शक्य आहे, ते व्यवहार देखील चालू राहतील. बहुतांश बँका त्यांच्या ग्राहकांना 24 तास ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देतात.

Banks will be closed for 17 days in August, check the holiday list to avoid delays

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा