धक्कादायक : पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे निधन - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, २७ जुलै, २०२०

धक्कादायक : पंढरपूर भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे निधन
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर कोरोनाने देशात थैमान घातले आहे. एकीकडे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत असताना, महाराष्ट्र राज्याला कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यानं अनेक नेतेमंडळीही गमवली लागली आहेत. यातच आज भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर (वय.52) यांचे कोरोनामुळे निधन झाले.  BJP city president Sanjay Waikar dies due to corona


संजय वाईकर यांना 10 दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचा अहवाल आला होता.त्यांच्यावर वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू केले होते.मात्र त्यांची प्रकृती खालावली गेल्याने सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले होते.


तिथे रक्तदाब आणि शुगरचे प्रमाण खालावल्याने सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले.संजय वाईकर यांनी साप्ताहिक आपलं मत , दै प्रभात , दै निर्भीड च्या माध्यमातून सुमारे 10 वर्षे पत्रकारिता केली . मागील 3 वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. सोलापूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा