अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री पद मिळावे! 'या' आमदारानी दिल्या शुभेच्छा - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २२ जुलै, २०२०

अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री पद मिळावे! 'या' आमदारानी दिल्या शुभेच्छा


टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील कार्यकर्त्यांसोबतच आपली ही इच्छा आहे,आणि ते लवकरच मुख्यमंत्री व्हावेत अशा अशा शब्दात वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवेढा-पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी शुभेच्छा दिल्या असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (  Ajit Pawar should get the post of Chief Minister of the state MLA bharat bhalake best wishes  ) 


आज दि.22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करू नये अशी सूचना अजित पवार यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना केली आहे. त्यामुळे मंगळवेढा-पंढरपूर मधेही अजित पवारांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होईल असे कार्यकर्त्याकडून सांगितले जाते.


अजित पवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंगळवार ( दिनांक 21 जुलै ) रोजी पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे.सुमारे 56 सेकंदाच्या या व्हीडिओमध्ये आमदार भालके यांनी अजित पवारांच्या कामाचे,त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.


तसेच अजित पवार यांना लवकरच मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी,त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशा सदिच्छा या व्हिडिओमध्ये आमदार भालके यांनी व्यक्त केल्या आहेत.
---------------------------

📲 राज्यातीलदेशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा