बोंबला..! मंगळवेढ्यातील जेलमधून जामिनावर सुटलेला आरोपीला कोरोनाची लागण,अख्ख्या गावात खळबळ - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२०

बोंबला..! मंगळवेढ्यातील जेलमधून जामिनावर सुटलेला आरोपीला कोरोनाची लागण,अख्ख्या गावात खळबळ

Corona update

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील एका गावात मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला  पोलिसांनी सलगर बुद्रूक परिसरातून अटक केली आणि मंगळवेढा येथील सबजेलमध्ये ठेवले. जामीन होताच तो आरोपी आपल्या गावी परतला आणि त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अख्ख्या गावात खळबळ उडाली आहे. Accused released on bail from jail on mangalwedha infected with corona,

प्रशासनाने सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये सलगर बुद्रूक येथील तीन रुग्ण असल्याची बातमी सोशल मीडियातून धडकताच सलगर बुद्रूक गावात खळबळ उडाली.

त्यामुळे गावातील तरुण आपल्या गावातील कोण आहे, याचा शोध घेऊ लागले. चौकशीअंती त्यांना समजले, की बावची येथील तीन रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातून गेल्यामुळे त्यांची नोंद तिथे करण्यात आली. हे तीन आरोपी बावची गावातील असून, एकास मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटक करून मंगळवेढा येथील सबजेलमध्ये ठेवले होते.

मंगळवेढा सब जेलमधील पॉझिटिव्ह रुग्णांची व त्या संदर्भातील पोलिसांशी या आरोपींचा संबंध आल्यामुळे त्यांना संसर्ग झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. येथील सब जेलमधील 40 मधील जवळपास 35 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये या तिघांचा अहवाल देखील गावी गेल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना काही समजेनासे झाले. सबजेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर जामीन झालेल्यांना संस्थात्मक किंवा घरात विलगीकरण करणे आवश्‍यक होते. 

परंतु, तशी कृती न झाल्यामुळे ते थेट गावी पोचले. त्यामुळे गावी त्यांचा कोणाकोणाशी संपर्क आला, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनावर आहे. त्यांना त्यासंदर्भात कोणताही त्रास नसल्याचे ते सांगत असून, मग अहवाल पॉझिटिव्ह कसा आला? याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. प्रशासनाने गावाचा परिसर मात्र सील केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा