पंढरपूरमध्ये १६ वारकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत अ.भा.वारकरी मंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२०

पंढरपूरमध्ये १६ वारकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत अ.भा.वारकरी मंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर एकादशी निमित्त दि.2 जून रोजी पंढरपूरला वेगवेगळ्या भागातून १६ जण वारी निमित्त आले असता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.तरी दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रत्येक महिन्याला वारी निमित्ताने लाखो वारकरी येतात.वारी हा त्यांचा प्राण आहे.२ जून रोजी पंढरपूरला वेगवेगळ्या भागातून १६ जण आले.त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे.त्यांनी जाणीवपूर्वक चुक केलेली नाही.त्यामुळे वारकरी भाविका वरील गुन्हे रद्द करावेत.


त्यांना सध्या विलगी करण केलेले आहे.तेवढे पुरेसे होईल.त्यांच्या वरील गुन्हे ताबडतोब रद्द करावे. ही विनंती अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा प्रदेशाध्यक्ष हभप सुधाकर इंगळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष जोतिराम चांगभले , शहराध्यक्ष संजय पवार व सर्व पदाधिकारी यांनी दिला आहे.

Warkari Mandal's statement to the Chief Minister that the cases filed against 16 Warkaris in Pandharpur should be withdrawn

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा