पंढरपूरातील मठात एकाची आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 20, 2020

पंढरपूरातील मठात एकाची आत्महत्या


मंगळवेढा टाईम्स टीम । पंढरपूर शहरातील मठाच्या खोलीमध्ये एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.तानाजी ज्ञानोबा कोंडे असे मयत वृद्धाचे नाव असून , त्याने गळफास घेतल्याची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. One commits suicide in a monastery in Pandharpur

याबाबत सविस्तर वृत्त असे की , पंढरपूर शहरातील इसबावी येथे असणाऱ्या बाळकृष्ण फणसे मठामध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या मठाच्या एका खोलीमध्ये तानाजी ज्ञानोबा कोंडे ( वय ६० ) रा . केळवडे तालुका भोर , जिल्हा पुणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला . ही घटना समजताच , कोंडीभाऊ महादेव जाधव यांनी या घटनेची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली . माहिती मिळताच , पोलीस घटनास्थळी रवाना झाले.

मयताचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान या वृद्ध व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून , याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे या घटनेबाबत पुढील तपास हेडकॉन्स्टेबल वाघमोडे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment