खळबळजनक : मुल होण्यासाठी विवाहितेकडून करून घेतली अघोरी पूजा ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

खळबळजनक : मुल होण्यासाठी विवाहितेकडून करून घेतली अघोरी पूजा ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । पुणे येथील जिल्ह्यातील भिगवण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूल होत नाही म्हणून एका विवाहितेकडून अघोरी पूजा करून घेण्यात आली.


याप्रकरणी पीडित विवाहितेने छळ आणि अघोरी पूजा करण्यास भाग पाडल्या संबंधी तक्रार दिली असून भिगवण पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये एक महिला मांत्रिक आणि तिच्या सहकाऱ्याचाही समावेश आहे.फिर्यादी महिला २१ वर्षांची असून ती घरकाम करते.मूल होत नसल्याच्या कारणावरून या महिलेच्या पती सासू-सासरे यांनी संगनमत करून तिचा शारीरिक छळ केला.


वारंवार शिवीगाळ करून तिला मारहाणही केली. तर इतर दोन महिलांनी आपल्यामध्ये अलौकिक शक्ती असून आमच्या सांगण्यानुसार वागली नाही तर तुला मुल होणार नाही, अशी भीती घातली. तसेच या विवाहितेच्या केसाच्या दोन बटा ही या महिलांनी उपटून काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Bhigwan in Pune district Aghori pooja performed by a married woman to have a child;  Filed a case against 5 persons


---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment