सोलापूर ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हची संख्या 17 ने वाढली ; 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Sunday, June 21, 2020

सोलापूर ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हची संख्या 17 ने वाढली ; 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्णसमाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना आता डोके वर काढू लागला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार पाकणी (ता. ऊत्तर सोलापूर) येथे सारीचा तर मोहोळ शहरातील क्रांतीनगर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 196 इतकी झाली आहे.  ( Solapur rural corona updated )

आज आलेल्या अहवालामध्ये मोहोळ, पाकणी या दोन गावांशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पारधीवस्ती मुळेगाव 4 पुरुष व 6 स्त्री बाधित झाले आहेत. कुंभारी येथे 1 पुरूष व 1 स्त्री , बार्शी तालुक्यातील उपळाई ठोगे येथे 1 पुरुष,कसबा पेठ 1 स्त्री , शिवाजीनगर 1 स्त्री बाधित रुग्ण आढळून आला आहे. बार्शी,मुळेगाव, कुंभारी, मोहोळ येथील रुग्ण हे संपर्कामुळे बाधित झाले आहेत. तर पाकणी येथील बाधित रुग्ण हे सारीचे आढळून आले आहेत.  The number of positives increased in rural Solapur;  Most patients in South Solapur

आज 65 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 48 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर उर्वरीत 17 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 8 पुरुष व 9 स्त्रियाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 196 इतकी झाली आहे. आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 76 जण रुग्णालयातून बरे होऊन घरे गेले आहेत. तर 109 बाधित रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.

तालुकानिहाय बाधितांची संख्या

अक्कलकोट-30, बार्शी-30, करमाळा-0, माढा-7, माळशिरस-5, मंगळवेढा-0, मोहोळ-10, उत्तर सोलापूर-13, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-91, एकूण-196.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment