सोलापुरात कोरोनाचा फैलाव वाढताच, शुक्रवारी 6 जणांचा बळी ; नवे 4 रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Saturday, June 27, 2020

सोलापुरात कोरोनाचा फैलाव वाढताच, शुक्रवारी 6 जणांचा बळी ; नवे 4 रुग्ण


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह चार नव्या रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे चिंताजनक बाब म्हणजे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या 2 हजार 84 झाली असून त्यापैकी 234 जणांचा मृत्यू झाला आहे. four patients found solapur friday six people died solapur city


शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण खूपच अधिक असल्याने राज्यातील विविध मंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी स्वतंत्र समितीही नियुक्‍त केली, मात्र फारसे यश आल्याचे दिसत नाही.

शहरातील धमश्री लाईन, मुरारजी पेठ, आदर्श नगर, एमआयडीसी रोड याठिकाणी प्रत्येकी एक तर जुनी पोलिस लाईन येथे दोघांना शुक्रवारी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहरातील आतापर्यंत एक हजार 99 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सद्यस्थितीत 751 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण संख्या कमी-अधिक होत असतानाच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचीही संख्या समाधानकारक आहे.

'या' परिसरातील सहा जणांचा मृत्यू

जुना देगाव नाका येथील 45 वर्षीय, गुरुवार पेठेतील 85 वर्षीय, राज पॅलेस, सत्यम चौक परिसरातील 75 वर्षीय, जुनी पोलिस लाईन येथील 48 वर्षीय, बिलाल नगर, जुळे सोलापुरातील 52 वर्षीय, एनजी मिल चाळ परिसरातील 78 वर्षीय, गंगानगर व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी काहींना 17 तारखेला तर काहींना 22 तारखेला दाखल करण्यात आले होते.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment