संतापजनक : अवैधरित्या गर्भपात करून डॉक्टरने अर्भकाचे केले पाच तुकडे ; नगरमधली घटना - Mangalwedha Times

Breaking

Wednesday, June 24, 2020

संतापजनक : अवैधरित्या गर्भपात करून डॉक्टरने अर्भकाचे केले पाच तुकडे ; नगरमधली घटना


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । हॉस्पिटलमध्ये महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे पाच तुकडे केल्याची संतापजनक घटना अहमदनगरमध्ये घटली आहे. आरोपी डॉ.शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. The doctor made five pieces of the baby by performing an illegal abortion;  Incident in town

अहमदनगर तालुक्यातील जखणगाव यातील गंधे सर्जीलकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना निनावी फोन आला. त्यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरणबीकर यांना माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली.कारवाई दरम्यान आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment