विजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गरजु 100 कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

विजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गरजु 100 कुटूंबाना किराणा किट वाटपाचा शुभारंभ


सुरज फुगारे । सोलापूर जिल्हा मालवाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक विजय भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज सायंकाळी 6 वा. कागस्ट गावातील व परिसरातील 100 गरजू कुटूंबाना किराणा किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मरवडे येथील बालाजी पवार यांनी दिली.  Launch of distribution of grocery kits to 100 needy families on the occasion of Vijay Bhosale's birthday

याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे,मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,मरवडेचे धन्यकुमार पाटील,दामाजी कारखान्याचे संचालक विजय माने,बालाजीनगरचे माजी सरपंच विलास राठोड,कागस्टचे माजी सरपंच राजाराम बुरुंगले,नाना सांगोलकर,शांताराम बिराजदार, रेशनदुकानदार हणमंत पाटील,बबलू जगताप आदी जणांच्या उपस्थितीत किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.

कागस्ट गावातील व परिसरातील 100 कुटुंबियांना महिनाभर पुरेल असे किट देण्यात येणार असून यामध्ये सॅनिटाइजर, मास्क,गहू 5 किलो,तांदूळ 5 किलो, साखर 2 किलो,शेंगदाणे 1 किलो,तूरदाळ, मटकी दाळ, साबण,गोडेतेल आदि वस्तूंचा या किट मध्ये समावेश आहे.

सध्या कोरोनाचे सावट मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक जणांचे काम बंद असून त्यांचे हातावरचे पोट असल्याने विजय भोसले यांनी अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री लक्ष्मी ट्रेडर्सचे संचालक अजय भोसले यांनी केले आहे.No comments:

Post a Comment